वडसा-गडचिरोली रेल्वे लाईनच्या कामाची खासदार अशोक नेते यांच्याकडून पाहणी.


महत्वाकांक्षी प्रकल्पातील अडचणी दूर करणार…

नवनीती न्यूज

गडचिरोली, दि. 26 मे : गडचिरोली जिल्ह्यात रेल्वेमार्गाचे जाळे विस्तारण्यासाठी पुढाकार घेणारे खासदार अशोक नेते यांनी वडसा-गडचिरोली या महत्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पाच्या कामांना भेट देऊन या कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी सदर कामात असलेल्या काही अडचणी दूर करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्याची ग्वाही त्यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिली. तसेच हे काम जोमाने सुरू असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

 

वडसा-गडचिरोली रेल्वेमार्गाचे खरे मानकरी असणाऱ्या खा.नेते यांनी शनिवारी वडसा, कोंढाळा, आरमोरी व गोगांव येथील रेल्वेमार्गाच्या कामांना भेटी देऊन रेल्वेमार्गाच्या उभारणीची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह रेल्वेचे अभियंता होते. वडसा-गडचिरोली या रेल्वेमार्गाचे अनेक वर्षांपासून रखडलेले काम खा.नेते यांच्या सततच्या पाठपुराव्याने मार्गी लागून या कामाला प्रत्यक्षात सुरूवात झाली. शक्य तितक्या लवकर हे काम पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त करताना त्यांनी रेल्वेमार्गाचा विस्तार गडचिरोली जिल्ह्यात इतरही भागात करण्यासाठी आपण कटीबद्ध असल्याचे सांगितले.

Advertisement

 

40 भुयारी पुलांची होणार उभारणी

 

वडसा रेल्वे स्टेशन ते गडचिरोली रेल्वे स्टेशन यादरम्यान 40 भुयारी पुलांची उभारणी केली जाणार आहे. मात्र भुयारी पूलांची उभारणी आणि रेल्वेमार्गासाठी वनविभागाच्या काही अडचणींसोबत मुख्य वीजवाहक लाईन मध्ये येत असल्याने अडचण निर्माण झाली आहे. या अडचणी दूर करण्यासाठी संबंधित विभागांचे मंत्री, तसेच रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी यांच्याशी भेटून या अडचणी निकाली काढून रेल्वे लाईनच्या कामाची गती मंदावू देणार नाही, अशी ग्वाही यावेळी खा.नेते यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिली.

 

यावेळी आमदार कृष्णा गजबे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा,रेल्वे अभियंता शिवदत खंडाईत, सेक्शन अभियंता आर.पी सिंग,सेक्शन अभियंता नरेंद्र कुमार, भाजपा तालुकाध्यक्ष सुनिल पारधी, जिल्हा उपाध्यक्ष राजूभाऊ जेठानी,सहकार आघाडी चे जिल्हाध्यक्ष आशिष पिपरे, महामंत्री वसंता दोनाडकर,जेष्ठ नेते माणिक कोहळे, प्रमोद झिलपे,प्रकाश निकूरे, निलेश बोमनवार,योगेश नाकतोडे,तसेच मोठया संख्येनी नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!