भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्ण संधी


नवनीती न्यूज

चंद्रपूर, दि. 27 : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना संघ लोकसेवा आयोग (UPSC)  या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे  10 जून  ते 23 ऑगस्ट 2024 या कालावधीत सीडीएस कोर्स क्र. 63 आयोजित करण्यात येत आहे. सदर कोर्ससाठी प्रशिक्षणार्थींची निवास, भोजन, आणि प्रशिक्षणाची नि:शुल्क सोय करण्यात आली आहे.

Advertisement

 

 चंद्रपूर जिल्ह्यातील इच्छूक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, चंद्रपूर येथे 6 जून 2024 रोजी मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येतेवेळी त्यांनी Department 0f Sainik Welfare, pune (DSW) डिपार्टमेंट ऑफ सैनिक वेलफेअर, पुणे डीएसडब्लू (DSW) यांची वेबसाईट www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन (Other-PCTC NashikCDS-63) कोर्ससाठी (किंवा संबंधीत जिल्हा सौनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या ) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली प्रिंट पूर्ण भरुन सोबत घेऊन यावे.

 

 अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ईमेल आय डी training.pctcnashik@gmail.com व दूरध्वनी क्रमांक 0253-2451032 किंवा 9156073306 (प्रवेश पत्र मिळविण्यासाठी) असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण  अधिकारी, यांनी केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!