पोलीस बनू इच्छिणाऱ्या उमेदवारांना आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी केली आर्थिक मदत.
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी ग्राउंड वर केली चर्चा..!
नवनीती न्यूज
चामोर्शी, दि. 27 मे : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या चामोर्शी येथील नवयुवकांना व्यायाम कसरतीचा सराव करण्यासाठी लागणारे आवश्यक साहित्य खरेदी करता यावे याकरिता आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी त्यांना आर्थिक मदत केली व यथायोग्य सहकार्य करण्याचे आश्वासन देत अधिकाधिक तरुण पोलीस भरतीमध्ये पात्र व्हावे यासाठी शुभेच्छा दिल्या
आज सकाळी पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ग्राउंडवर जाऊन आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी या इच्छुक उमेदवारांसोबत चर्चा केली. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. आवश्यक कोणते कोणते साहित्य लागते त्याचे विषयी माहिती घेत ते साहित्य खरेदी करण्यासाठी तत्काळ आर्थिक मदत केली.
याप्रसंगी पोलीस निरीक्षक पुल्लूरवार साहेब,भाजपा जिल्हा सचिव दिलीप चलाख बंगाली आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेश शहा, यश गण्यारपवार ज़िल्हा महामंत्री भाजपा युवा मोर्चा, युवा नेते प्रतीक राठी यांचे सह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.



