सावरगाव जिरे येथे आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनानिमित्य कायदेविषयक जनजागृती उत्साहात


नवनीती न्यूज

Advertisement

वाशिम,दि.२२ मे (जिमाका) : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधिज्ञ संघाच्या संयुक्तवतीने २२ मे २०२४ रोजी  वाशिम तालुक्यातील सावरगाव जिरे येथे आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनाचे अनुषंगाने कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. हांडे यांची उपस्थि‍ती होती. यावेळी त्यांनी उपस्थितांना कायदेविषयक मार्गदर्शन केले. तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव व्ही. ए. टेकवाणी यांची प्रमुख उपस्थिती होती. आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक जयप्रकाश लव्हाळे यांनी आंतरराष्ट्रीय जैव विविधता दिवस या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. जिल्हा विधिज्ञ संघाचे ॲड. व्ही. एम. तिफणे यांनी बाल न्याय व्यवस्था आणि बालकांचे अधिकार या विषयावर मार्गदर्शन केले. जिल्हा विधिज्ञ संघाचे सचिव ॲड. मोहन देशमुख यांनी सार्वजनिक उपयोगिता सेवा या बाबत मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे संचालन ॲड  परमेश्वर शेळके यांनी केले. त्यांनी पीडितांसाठी व्हिक्टीम कॉम्पन्सेशन योजनेबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार ॲड.पी.पी. अंभोरे यांनी मानले.  कार्यक्रमाला  विधिज्ञ, जिल्हा विधि सेवा प्राधिकरणचे कर्मचारी, लोक अभिरक्षक, विधि स्वयंसेवक तसेच नागरीकांची उपस्थिती होती. दरम्यान गावामध्ये कायदेविषयकपत्रकाचे वितरण करण्यात आले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!