शेतकऱ्यांच्या जमीन अधिग्रहणाचे व सिंचनाचे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावा – आ. होळी


नागपूर येथे विदर्भ पाटबंधारे विकास  महामंडळाचे संचालक व अभियंत्यांसोबत  घेतली बैठक.

नवनीती न्यूज

गडचिरोली, दि. २२ मे : गडचिरोली विधानसभा क्षेत्रात अनेक सिंचन प्रकल्पांना मंजुरी मिळाली असून त्यांना निधी उपलब्ध करून काम सुरू करण्याची आवश्यकता तसेच चीचडोह बॅरेज सिंचन प्रकल्पात शेत जमीन गेलेल्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला देऊन जमिनीचे अधिग्रहण करावे अशी सूचना आमदार डॉक्टर देवरावजी होळी  यांनी नागपूर येथे विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये केली.

 

चिंचडोह जमीन अधिग्रहण , राजीव उपसा सिंचन योजना  वसा-पोर्ला उपसा सिंचन योजना रेगडी  जलाशयाच्या  कालव्याची दुरुस्ती, पीडिएन द्वारे गोगाव उपसा सिंचन योजना,  रेगडी जलशयातून नवीन सिंचन योजना व बंद पडलेल्या अनखोडा उपसा सिंचन योजना  यासारख्या योजनांना मंजुरी व विविध समस्या सोडवण्यासाठी बैठकीचे आयोजन

Advertisement

 

या प्रसंगी आयोजित बैठकीला विदर्भ विकास पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालक सोनटक्के साहेब, मुख्य अभियंता पवार साहेब, अधीक्षक अभियंता पाटील साहेब,कार्यकारी अभियंता झोड साहेब , सहाय्यक अभियंता श्रेणी- 1 मेश्राम साहेब  भाजपा नेते दिलीप चलाख, राजू धोडरे, निखिल धोडरे, शेतकरी देवनाथ बोधलकर, प्रकाश गव्हारे, देवाजी जुवारे, सतीश भांडेकर, अशोक धोडरे, प्रदीप साखरे गणेश लटारे, उपस्थित होते.

 

चीचडोह सिंचन प्रकल्प सुरू होवून  बराच कालावधी झाला मात्र त्यात जमीन गेलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीचे अधिग्रहण अजूनपर्यंत  झालेले नाही. त्यामुळे  शेतकऱ्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला तातडीनं देवून,  अधिग्रहण करून त्यांना  देण्यात यावा अशी मागणी केली. गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असणारे सिंचन प्रकल्प लवकर मार्गी लागावे याकरिता बैठकीचे नियोजन केले. त्यामध्ये चामोर्शी तालुक्यातील राजीव उपसा सिंचन योजना भेंडाळा, वसा-पोर्ला उपसा सिंचन योजना , रेगडी कन्नमवार जलाशयाचे पाणी टेल (शेवट) पर्यंत पोहोचत नसल्याने रेगडी  जलाशयाच्या  कालव्याची दुरुस्ती करणे, पीडिएन द्वारे पाणीपुरवठा  करून गोगाव उपसा सिंचन योजना कार्यान्वित करणे,  रेगडी जलशयातून नवीन उपसा सिंचन योजना सूरू करणे,बंद पडलेली अनखोडा  सिंचन  योजना सूरू करून पीडिएन द्वारे शेतीला पाणीपुरवठा करणे इ. चर्चा झाली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!