गडचिरोली आरमोरी राष्ट्रीय महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करा – डॉ. मिलिंद नरोटे


नवनीती न्यूज          

गडचिरोली, दि. 29 : आरमोरी गडचिरोली या महामार्गाची दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे अनेक अपघाताच्या बातम्या समोर येत आहेत, अपघात घडत आहेत तसेच गंभीर रुग्ण व गर्भवती महिलांना उपचारासाठी गडचिरोली किंवा नागपूर जायचे झाल्यास याच मार्गाने जावे लागते मार्गाची अवस्था अत्यंत बिकट असल्याकारणाने वेळेचं अपव्यय व त्रास रुग्णांना तसेच सामान्य व्यक्तींना सहन करावे लागत आहे.

चामोर्शी रोड राष्ट्रीय मार्गावरील  पथदिवे अनेक दिवसापासून बंद आहेत हा मार्ग अत्यंत वर्दळीचा आहे पथ दिवे बंद असल्याने अनेक अपघातांना निमंत्रण दिल्यासारखे आहे.

चंद्रपूर मार्गावरील दुभाजक मुरखळा पर्यंत वाढवण्यात यावे, जिल्हा परिषद शाळा नवेगाव-मुरखळा जवळ गतिरोधक किंवा विद्यार्थ्यांना रस्ता पार करण्यासाठी पर्यायी मार्ग बनवून देण्यात यावे.

       

Advertisement

येणाऱ्या सात तारखेला गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे त्याकरिता महामार्गावरील घनकचऱ्याचे विल्हेवाट व मार्ग स्वच्छ करून द्यावे यासाठी राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाला भेट देऊन उपकार्यकारी अभियंता (अतिरिक्त) श्री आर. डी. लिंगावार यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी प्रामुख्याने भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा प्रभारी आदिवासी मोर्चा जिल्हा गडचिरोली डॉ. मिलिंद नरोटे जिल्हाध्यक्ष युवा मोर्चा अनीलजी तिडके, उपाध्यक्ष युवा धनंजय सहदेवकर, जिल्हाध्यक्ष बंगाली सत्यजित सरदार, जिल्हा महामंत्री मंगेश रणदिवे, महामंत्री युवा मोर्चा सागर हजारे, तालुका महामंत्री युवा मोर्चा हरीश माकडे, शहराध्यक्ष युवा मोर्चा विशाल हरडे, शहर उपाध्यक्ष अनिकेत विश्रोजवार, शहर महामंत्री अभिलास बोमनवार, जिल्हाध्यक्ष अभियंता सेल वीरेंद्र बोपचे, चेतन कोलते, आशुतोष गोरले, अभिजित मुचलवार, साई सिल्लमवार, परमानंद पुन्नमवार, हेमंत म्हशाखेत्री आदी युवा मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!