आम आदमी पार्टिचा विज वितरण कर्मचाऱ्यांच्या उपोषनाला पाठिंबा.
नवनीती न्यूज
गडचिरोली : विविध मगण्यांना घेऊन विज वितरण महावितरण च्या कंत्राटी कर्मचार्यांनी पोटेगाव मार्गावरिल महावितरण विज कार्यालयासमोर बेमुदत उपोषन सुरु केले आहे. दुसऱ्यां दिवशी ही कर्मचारी उपोषणावर ठाम आहेत.
आम आदमी पार्टिने कर्मचार्यांच्या उपोषणास जाहिर पाठींबा दर्शवला आहे.
वीज कंत्राटी कामगार कर्मचारी यांच्या बेमुदत उपोषणाला आम आदमी पार्टी जिल्हा गडचिरोली वतीने सक्रिय जाहीर पाठिंबा
वीज कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सामावून घेणे.
कंत्राटी कर्मचाऱ्यांना विना अट सेवाज्येष्ठता नुसार सामावून घेणे.
60 वर्षा पर्यंत नोकरीची हमी देणे.
सेवाज्येष्ठता यादी पोर्टलवर प्रसिद्ध करणे.
कर्मचाऱ्यांना वेतनामध्ये 40%वाढ करणे.
आदी मागण्या पाठिंबा देण्यात आले. त्यावेळी आम आदमी पार्टिचे जिल्हा अध्यक्ष बाळकृष्ण सावसाकडे, ओबीसी आघाडी अध्यक्ष संतोष कोटकर, सहसचिव गणेश त्रिमुखे, महिला युवा आघाडी अध्यक्ष सोनल नन्नावरे, सेवानिवृत्त शिक्षक आघाडी अध्यक्ष जाणिकराव नन्नावरे, शहर प्रमुख नामदेव पोले, शहर संघटनमंत्री हितेंद्र गेडाम, सेवानिवृत्त आघाडी हेमराज हस्ते, युवा कार्यकर्ते लोकेश जुमनाके आदी कार्यकर्ते उपस्थित होते.



