गडचिरोली जिल्ह्यात जमाव बंदी आदेश आदेश लागू.
नवनीती न्यूज़
गडचिरोली : आगामी सन उत्सव निमित्त गडचिरोली जिल्ह्यात सामाजिक, धार्मिक कारनांसाठी व मगण्यां साठी विविध आंदोलने, नक्षल चळवळी गतिविधि लक्षात घेता कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा यासाठी जिल्ह्यात 02 मार्च 2024 ते 16 मार्च 2024 पर्यंत महाराष्ट्र पुलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) आणि (3) अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून पुढील गोष्टींना मनाई केली आहे.
तलवारी, सोटे, हत्यारे, बंदका, भाले, सूरे, लाठया घेऊन फिरणे.
दाहक किंवा स्फोटक पदार्थ घेऊन फिरणे.
शांतता धोक्यात येईल अशी भाषणे करणे.
प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.
नमूद प्रतिबंधात्मक कालावधीत कोणताही मोर्चा, मिरवणूका तसेच सभा, प्रचार, सभेचे आयोजन करवायाचे असेल तर संबंधित उपविभागीय दंडाधिकारी यांची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मनाई आदेश निर्गमित करण्यात आले आहे.



