देसाईगंज येथे काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवडीबद्दल विजय वडेट्टीवार यांचा अभिनंदन सोहळा. तथा आमदार रामदास मसराम यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोहळा..


नवनीती न्यूज

गडचिरोली : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र विधिमंडळ पक्षनेतेपदी माननीय आमदार विजयभाऊ वडेट्टीवार साहेब यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा भव्य सत्कार व अभिनंदन सोहळा आयोजित करण्यात आला. या सोहळ्यात हजारो कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

 

यावेळी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे  आमदार रामदासजी मसराम यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटनही माननीय विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या हस्ते संपन्न झाले.  यानंतर आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात विजयभाऊ वडेट्टीवार यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “काँग्रेस पक्ष हा जनतेचा पक्ष असून, सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर संघर्ष करण्यासाठी मी सदैव कटिबद्ध आहे. आगामी काळात पक्ष अधिक बळकट करण्यासाठी आपण सर्वांनी एकजूट होण्याची गरज आहे.”

 

आमदार रामदासजी मसराम यांनी आपल्या भाषणात कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करत सांगितले की, “नवीन जनसंपर्क कार्यालय हे जनतेसाठी नेहमी खुले राहील आणि लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी कार्यरत राहील.”

Advertisement

 

या सोहळ्यात उपस्थित – गडचिरोली – चिमूर लोकसभा चे खासदार मान. डॉ.नामदेवजी किरसान साहेब,काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष गड, मा.महेंद्रभाऊ ब्राम्हणवाडे,माजी सभापती, मा.परसराम टिकले,माजी जिल्हा.प. उपाध्यक्ष. तथा काँग्रेस क.तालुकाध्यक्ष कुर मा.जीवन पाटील नाट,काँग्रेस क.तालुकाध्यक्ष देसाईगंज, मा.राजेंद्र बुल्ले,काँग्रेस क.तालुकाध्यक्ष कोरची, मा.मनोज अग्रवाल,काँग्रेस क.तालुकाध्यक्ष आरमोरी, मा.मिलिंद खोब्रागडे, मा. जेसाभाऊ मोटवानी, डॉ महेश कोपुलवार, मा.मनोज वनमाळी, मा, अमोल मारकवार मा.राजुभाऊ रासेकर, मा.इलियास पठाण,मा.सतीश विधाते, मा.भांतकुलकर साहेब,कुसुमताई अलाम पक्षाचे अनेक मान्यवर नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

या सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी काँग्रेस पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास उपस्थित सर्वांनी विजयभाऊ वडेट्टीवार व रामदासजी मसराम यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!