निवडणुकीतील विजयासाठी खासदार नेते यांचे संत भोजाजी महाराज मठात साकडे


नवनीती न्यूज

गडचिरोली, दि.1 जून: गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे सलग 10 वर्षांपासून प्रतिनिधीत्व करत असलेले भाजपचे खासदार तथा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यावेळच्या निवडणुकीतही महायुतीचे उमेदवार होते. येत्या 4 जूनला जाहीर होणाऱ्या निकालात आपल्याच बाजुने कौल मिळावा असे साकडे घालत त्यांनी सहपरिवार संत भोजाजी महाराज मठात दर्शन घेतले.

 

आजनसरा येथे सहपरिवार घेतले दर्शन

Advertisement

वर्धा जिल्ह्यातील आजनसरा येथे संत भोजाजी महाराज मठात खा.नेते यांच्यासोबत त्यांचे कुटुंबिय, तसेच भाजपच्या ओबीसी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष राजू देवतळे आणि त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते. यावेळी श्री संत भोजाजी महाराज संस्थानचे अध्यक्ष डॉ.विजय पर्वत यांनी खासदार नेते व भाजप नेते राजू देवतळे यांच्या परिवाराचे स्वागत केले. तसेच खा.अशोक नेते, अर्चनाताई नेते, राजू देवतळे, अंजनाबाई देवतळे, गुलाबराव फरकाडे यांचा शाल-श्रीफळ व श्रीची प्रतिमा देऊन सत्कार केला.

 

यावेळी सदर मान्यवरांनी प्रसादालयात महाप्रसादही ग्रहण केला. दरम्यान खा.नेते यांना संस्थेचे अध्यक्ष डॉ.पर्वत यांनी संस्थानच्या विकासकार्यासंदर्भात निवेदन दिले. यावेळी रामदास हेमके, प्रणय देवतळे, गणेश मंगर रा.तिरखुरा, डॉ.लोंढे आदी उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!