IPL सट्टा जुगार खेळणाऱ्यावर गेस्ट हाऊस येथे छापा
नवनीती न्यूज
Advertisement
अहेरी दि. 29 : येथील बालाजी गेस्ट हाऊस येथे छापा मारून, बनावटी एपवर ऑनलाईन आय.पी.एल क्रिकेट वर सट्टयाचा खेळ खेळुन इतर लोकांना त्यावर पैसे लावुन नशिब आजमावुन आय.पी.एल सट्टा जुगार खेळ खेळवित असल्याचे दिसुन आले. गुन्हयातील १० आरोपीं विरुध्द पोलिस स्टेशन अहेरी येथे महाराष्ट्र जुगार बंदी कायदा कलम 4 व 5 कायदयान्वये गुन्हा नोंंद करण्यात आला आहे.



