निखिल वागळे यांच्यावर हल्ला
नवनीती न्यूज
पुणे : भाजप कार्यकर्त्या द्वारे पत्रकार निखिल वागळे यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचे बोलले जात आहे. ते ज्या कार ने पुण्यात यात्रा करत होते तेथे त्यांच्या कारवर हल्ला झाला. त्यांच्या कारचे खिडकीचे काच फोडले गेले, शाही फेकले गेले त्यामुळे तेथील वातावरण चांगलेच तापले होते.
दुसऱ्या दिवशी ची त्यांची पोस्ट चर्चेत आहे.
पंतप्रधान मोदी आणि लालकृष्ण आडवाणी च्या विरोधात बोलल्या प्रकरणी हल्ला करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
पत्रकार निखिल वागळे, सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, वकील असीम सरोदे यांचा ‘निर्भय बनो’ कार्यक्रम पुण्यातील राष्ट्रसेवा दलाच्या कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला जात असतांना पत्रकार निखिल वागळे यांच्यावर भाजप कार्यकर्त्यांनकडून हल्ला करण्यात आला. यात निखिल वागळे व त्यांचे सहकारी बचावले पन गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
निखिल वागळे यांनी भाजप च्या विरोधात पोस्ट केली होती. भाजपा ने आक्रमक पवित्रा घेतला. त्यांनी निर्भय बनो कार्यक्रमाला विरोध केला होता. पोलिसांनी त्यांना कार्यक्रमाला न जाण्याचा सल्ला दिला होता. पन वागळे कार्यक्रमात जाण्यावर ठाम होते. त्यांना दांडेकर पुलाजवळील राष्ट्रसेवा दलाच्या कार्यालया बाहेर कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमानात जमा होऊन घेराव घातला व गोंधळ घालन्याचा प्रयत्न केला.
पुलिसांनी निखिल वागळे, असीम सरोदे यांना खुप वेळ पर्यंत वसवून ठेवण्यात आले होते. त्यातच राष्ट्रसेवा दलाच्या कार्यालया समोर महायुति व महाआघाडीच्या कार्यकर्ते एकमेकां समोर आले होते.
भाजप कार्यकर्त्यांनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा नोंदवन्यात आला आहे.
‘निर्भय बनो’ सभेच्या ठिकाणी जमाव बंदीचा आदेश पण देण्यात आला होता. त्यामुळे पन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सभेच्या ठिकाणी दगड फेक पन करण्यात आली होती. काही काळा पर्यंत त्या ठिकाणी तनावाचे वातावरण निर्माण झाले होते.



