समिधा कॉलेज ऑफ सिविल सर्विसेस अडपल्ली, (गोगाव) गडचिरोली तर्फे आयोजित किसान ज्युनिअर कॉलेज, जेप्रा येथे स्कूल कनेक्ट (NEP कनेक्ट) कार्यशाळा संपन्न
नवनीती न्यूज
जेप्रा, गडचिरोली : किसान ज्युनिअर कॉलेज, जेप्रा येथे इयत्ता 11 वी व 12 वी च्या विध्यार्थ्यांसाठी एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
मुख्यत्वे हि कार्यशाळा स्कूल कनेक्ट (राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020) महाराष्ट्र शासनाच्या निर्देशित सुचणे प्रमाणे घेण्यात आली.
कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, रामटेक द्वारा संलग्नित समिधा कॉलेज ऑफ सिविल सर्विसेस, अडपल्ली (गोगाव) गडचिरोली अंतर्गत किसान ज्युनिअर कॉलेज, जेप्रा येथे इयत्ता 11 वी व 12 वी मधील विध्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल माहिती देण्यात आली.
विध्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळेल व त्यांचा शैक्षणिक विकास होईल या उद्देशाने हि माहिती देण्यात आली.
यात प्रामुख्याने उच्च शिक्षणातील संधी, मातृभाषेतील शिक्षण, कौशल्यावर आधारित विकास शिक्षण, Online शिक्षण प्रणाली, (CBCS) व (NCRF) प्रणाली, बहुआयामी शिक्षण कौशल्य विकास व अनेक पैलूंवर मार्गदर्शन करण्यात आले.
समिधा कॉलेज ऑफ सिविल सर्विसेस अडपल्ली, (गोगाव) गडचिरोली तर्फे आयोजित किसान ज्युनिअर कॉलेज, जेप्रा येथे स्कूल कनेक्ट (NEP कनेक्ट) कार्यशाळा संपन्न
सदर कार्यशाळेत कार्यशाळेचे अध्यक्षस्थान किसान ज्युनिअर कॉलेजचे प्रा. श्री सचिन म्हशाखेत्री सर यांनी भूषविले.
तसेच कार्यशाळेचे मुख्य मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन प्रा. तिलेश मोहुर्ले सर, समिधा कॉलेज ऑफ सिविल सर्विसेस अडपल्ली, (गोगाव) यांनी केला.
तर समिधा कॉलेज ऑफ सिविल सर्विसेसचे सहकारी प्राध्यापक या कार्यशाळेत प्रा. नितीन नैताम सर, प्रा. अंकुश गोहणे सर, प्रा. प्रितम कोहपरे सर उपस्थित होते.
या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी किसान ज्युनिअर कॉलेज चे विद्यार्थी तसेच ज्युनिअर कॉलेजचे शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केला.



