सोमणपल्ली डॉ. बाबासाहेब आंबेडकर आक्षेपार्य लिखाण प्रकरण आसपा चा प्रशासनाला 24 तासाचा अल्टिमेटम


नवनीती न्यूज

आष्टी : चामोर्शी तालुक्यातील आष्टी जवळ असलेले सोमनपल्ली या गावच्या बस स्टैंड वर काही जातीयवादी नराधमांनी  महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयक अत्यंत अपमान जनक  व आक्षेपार्य विकृत विधान लिहिलेले आढळले आहे. सदर कृत्य हे अत्यंत निंदनीय असून आझाद समाज पार्टी युवा आघाडीच्या वतीने या कृत्याचा तीव्र निषेध करून आजाद समाज पार्टी युवा आघाडी जिल्हाध्यक्ष विवेक खोब्रागडे परिसरातील नागरिकांसह आष्टी पोलीस स्टेशन वर धडक दिली. आणि या प्रकरणाची चौकशी करून तात्काळ दोषी नराधमांवर अतिशय कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली .

 

सोमणपल्ली डॉ. बाबासाहेब आंबेडकर आक्षेपार्य लिखाण प्रकरण – आझाद समाज पार्टी युवा आघाडी आक्रमक

Advertisement

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कुण्या विशिष्ट जातीचे महापुरुष नसून तथा त्यांनी  भारताला दिलेले संविधान हे कुण्या एका विशिष्ट जातीसाठी नाही तर समस्त बहुजनांच्या  व भारतात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांच्या हक्क -अधिकाराचे प्रतीक आहे. आणि अशा प्रकारचे तुच्छ कृत्य करून समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचे हे षडयंत्र असून आगामी स्थानिक स्वराज्य  संस्थांच्या निवडणुकामध्ये यामागे कुणाचे तरी षडयंत्र असल्याचा आरोप युवा आघाडी अध्यक्ष विवेक खोब्रागडे यांनी केला.

 

युवा आघाडी जिल्हाध्यक्ष  विवेक खोब्रागडे यांची कार्यकर्त्यांसह आष्टी पोलीस स्टेशनवर धडक : प्रशासनाला 24 तासाचा अल्टिमेटम

सदर प्रकरणाची चौकशी करून गुन्हेगाराला 24 तासात शोधून कठोर कारवाई करावी अन्यथा आजाद समाज पार्टी युवा आघाडी तीव्र आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला. निवेदन देताना एएसपी कार्यकर्त्यांसह परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!