एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय देवरी अंतर्गत पुराळा येथे आदिवासी आश्रम शाळेत मार्गदर्शन कार्यक्रम


नवनीती न्यूज

देवरी, दि. 1 : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय देवरी अंतर्गत येणाऱ्या पुराळा या आदिवासी आश्रम शाळेत दिनांक १ फेब्रुवारी २०२५ रोज शनिवार ला प्रेरणादायी मार्गदर्शन व बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक मा. विलासदादा भोगारे ( राष्ट्रीय समन्वयक व पेसा अभ्यासक बिरसा ब्रिगेड ) यांनी आदिवासी आश्रम शाळा पुराळा येथील विघार्थी यांना मार्गदर्शन करतांना विशेष करून १० वी आणि १२ वी च्या विघार्थी यांना समोर शिक्षणाच्या संधी व स्पर्धा परीक्षा बरोबरच आदिवासिंची संस्कृती, आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसाठी करिअर, आदिवासीच वीज्ञान व त्यालाच अंधश्रद्धेच्या नजरेने पाहण्याचा सामाजिक दृष्ठिकोन, कार्बन उत्सरजण इत्यादी विषयावर मार्गदर्शक केला.

Advertisement

 

या कार्यक्रमाला मा.कापसे सर ( आदिवासी आश्रम शाळा पुराळा मुख्याध्यापक ) , मा.दिलीप वाघमारे ( पंचायत समिती सदस्य देवरी ),मा दुर्गेश उईके सर , मा.ओम मडावी सर , प्रा.हट्टेवार सर , प्रा.नेनावत मॅडम , ग्रंथापाल खंडाते मॅडम ,मा.पळवे सर , मा.भक्ता सर , मा.मेसराम मॅडम , मा.बिसेन सर ,मा.लिल्हारे सर ,आणि आश्रमशाळेतील शिक्षक ऊपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!