आपल्या समाजामध्ये राजकीय जागरूकता असणे महत्त्वाचे आहे – डॉ मिलिंद नरोटे


नवनीती न्यूज

गडचिरोली, दि. 05 : विरंगणा राणी दुर्गावती यांच्या जयंतीनिमित्त अभिनव लॉन गडचिरोली येथे समाज प्रबोधन कार्यक्रम आयोजित केला होता त्या  कार्यक्रमात समाजातील शेकडो नागरिक उपस्थित होते. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा प्रभारी आदिवासी मोर्चा चे डॉक्टर मिलिंद नरोटे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.

Advertisement

समाजामध्ये बदल घडवायचा असेल तर आपल्याला वेळेनुसार आपल्यात बदल घडवणे आवश्यक आहे. आपल्या समाजात मागासलेला नसून अनेक उच्चशिक्षित तथा अधिकारी वर्ग आपल्या समाजात आहे त्यांच्या मार्गदर्शनात आपण एकजुटीने समोर जाणे गरजेचे आहे असे प्रतिपादन डॉक्टर मिलिंद नरोटे यांनी केले.

यावेळी प्रामुख्याने माजी आमदार हे हरीरामजी वरखडे, जेष्ठ समाज सुधारक देवाजी तोफा, माजी आमदार नामदेव उसेंडी, अध्यक्ष जिल्हा कामगार सोसायटी पुर्णचंद्रराव रायसिडाम, माजी आमदार हिरामण वरखडे, माजी आमदार आनंदराव गेडाम, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष चंद्रताई कोडवते, सिनेट सदस्य डॉ. प्रा. नरेश मडावी, लालाजी ऊसेंडी चरणदास पेंदाम, ॲड.दिलीप मडावी, अर्चनाताई मडावी व समाज बांधव उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!