जि.प. अभियंता संघटनेच्या लेखणी बंद आंदोलनाला डॉ. मिलिंद नरोटे यांची भेट
नवनीती न्यूज
गडचिरोली, दि. 10 सेप्टेंबर : जि.प.अभियंता संघटना महाराष्ट्र शाखा गडचिरोली यांनी आपल्या मागण्या घेऊन 27 ऑगस्टपासून असहकार आंदोलन व लेखणी बंद आंदोलन सुरू आहे.
गडचिरोली येथील जि.प. कार्यालयासमोर 5 सप्टेंबर पासून सुरु असलेल्या बेमुदत लेखणी बंद आंदोलनाला जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा प्रभारी आदिवासी मोर्चा डॉ. मिलिंद रामजी नरोटे यांनी या आंदोलनाला भेट देऊन आंदोलकांशी चर्चा व त्यांच्या विविध मागण्या समजून घेत आपल्या मागण्या घेऊन सरकार सोबत आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत चर्चा करून लवकरात लवकर मागण्या पूर्ण करून देण्याचे आश्वासन दिले.

यावेळी जिल्हा परिषदचे कर्मचारी के. एस. ढवळे, पी.बी.झोपे, व्ही. ए. मेश्राम, एस. व्हि. तांसेल, पी. के. सरोदे, बी. व्ही. शेंडे, ए. डी, भोयर, के. आर. सलामे, ए. ए. तलवारे, ए. एस. कुंभारे, आर. के नागदेवते, ए. एम. वाकडे, ए. पी. कावळे, डी. एन. गोवरदिपे, पी. एम. मडावी, पी. के. निमगडे, एम एस रायपुरे उपस्थित होते.
त्याचबरोबर भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री. अनिलजी तिडके, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष धनंजय सहदेवकर, बंगाली आघाडी जिल्हाध्यक्ष सत्यजित सरदार, युवा मोर्चा जिल्हा सचिव सागर हजारे युवा मोर्चा सांस्कृतिक प्रमुख साई सिल्लमवार, युवा मोर्चा जिल्हा मीडिया प्रमुख चेतन कोलते, युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष अनिकेत विश्रोजवार युवा मोर्चा शहर महामंत्री अभिलाष व सहकारी उपस्थित होते.



