खर्डा येथे अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला
नवनीती न्यूज
यवतमाळ, दि. 25 (जिमाका) : बाभुळगाव पोलिस स्टेशन अंतर्गत असलेल्या मौजा खर्डा येथील शेतशिवारात एका शेतकऱ्याच्या विहिरीत अनोखळी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. मृतकाच्या अंगात फिक्कट हिरव्या रंगाचे फुल बाह्याचे शर्ट, निळ्या रंगाचा फुल पॅंन्ट परिधान आहे. अशा वर्णनाच्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी पोलिस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
खर्डा येथील पोलिस पाटील जहीर बेग मुस्ताक बेग मुघल यांनी दि. 22 जून रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास खर्डा शेत शिवारातील बंडू अशोक दिघाडे यांच्या शेतातील विहिरीत एक अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळल्याचे पोलिस स्टेशनला कळविले होते.
मृत व्यक्तीचे वय अंदाजे 40 ते 45 वर्ष असून मृतदेह पाण्यावर तरंगतांना आढळून आला. पोलिस पाटलाच्या जबानी फिर्यादीवरून बाभुळगाव पोलिस स्टेशनमध्ये मर्ग दाखल करण्यात आला असून चौकशी केली जात आहे.
अनोळखी मृतक वय अंदाजे 40 ते 45 वर्षाचा असून उंची 5.5 फुट आहे. बांधा मध्यम, अंगात फिक्कट हिरव्या रंगाचे फुल बाह्याचे शर्ट, निळ्या रंगाचा फुल पॅंन्ट परिधान केलेला आहे. अशा वर्णनाच्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी पोलिस निरिक्षक एल.डी.तावरे 9922903263 व पोलिस हेड कॅान्सटेबल गणेश शिंदे 9822909419 यांच्याशी संपर्क करावा, असे कळविण्यात आले आहे.



