कृषि तंत्र पदविका अभ्यासक्रमासाठी अर्ज आमंत्रित
नवनीती न्यूज
वर्धा, दि.10 (जिमाका) : डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला कार्यक्षेत्रांतर्गत दोन वर्ष मराठी कृषि तंत्र पदविका अभ्यासक्रमासाठी शिल्लक जागेकरीता प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने सुरु करण्यात आली आहे. या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी दि.08 जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावे, असे आवाहन कृषि तंत्र विद्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.
प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक माहिती पुस्तिका व अर्ज विद्यापिठाच्या https://www.pdkvdiplomaadmission.com या संकेतस्थळावर उपलब्ध असून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. प्रवेश घेऊ इच्छिणारा विद्यार्थी माध्यमिक शालांत परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असावा. ऑनलाईन अर्ज भरतांना उमेदवाराचे पासपोर्ट आकाराचे रंगित छायाचित्र, उमेदवाराची स्वाक्षरी, संबंधित मुळ प्रमाणपत्रे, कागदपत्रे स्कॅन करुन संकेतस्थळावर अपलोड करावीत. प्रवेश अर्ज टपालाने किंवा कुरीअरद्वारे पाठवू नये. अर्ज भरतेवेळी प्रवेश शुल्क डेबिट कार्ड, क्रेडीट कार्ड, नेट बँकींग किंवा युपीआयद्वारे भरावे.
प्रवेश अर्जचे शुल्क खुल्या प्रवर्गासाठी 500 रुपये, आरक्षित प्रवर्गासाठी 250 रुपये आकारण्यात येणार आहे. उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र अनिवार्य आहे, अर्ज दाखल करतेवेळी ज्या विद्यार्थ्यांना कृषि तंत्र विद्यालय सेलसुरा येथे प्रवेश घ्यावयाचा आहे, अशा विद्यार्थ्यांनी कृषि तंत्र विद्यालय, सेलसुराचा 1203 हा सांकेतिक कोड नमुद करावा, असे कृषि तंत्र विद्यालय सेलसुराचे प्राचार्य डॉ. एन. पी. जंगवाड यांनी कळविले आहे.



