खासदार अशोक नेते यांनी घेतली अपघातग्रस्त भांडेकर यांची भेट


नवनीती न्यूज

नागपुरात भरती, आर्थिक मदतही दिली.

Advertisement

गडचिरोली, दि.२४ एप्रिल : व्याहाड बुज. येथील नरेश भांडेकर यांचा रविवारी गडचिरोली – चंद्रपूर मार्गावरील सावलीच्या पेट्रोल पंपाजवळ अपघात झाला. त्यांच्यावर नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खासदार अशोक नेते यांनी नागपूर येथील चिरायू रूग्णालयात जाऊन भांडेकर यांची भेट घेऊन डॉ.शंशाक खरवडे यांच्याशी चर्चा केली. गंभीर जखमी झालेल्या भांडेकर यांच्यावर चांगल्या प्रकारचे उपचार करून त्यांना लवकर बरे करावे अशी सूचना करत खा.नेते यांनी उपचारासाठी आर्थिक मदतही केली.तसेच यावेळी  ऑपरेशनच्या खर्चाच्या संबंधी मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत केसेसचा पाठपुरावा करत प्रयत्न  केला जाईल.असे याप्रसंगी खा.नेते यांनी डॉक्टरांशी चर्चा करून नातेवाईकांना सूचना केल्या.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!