महिला महाविद्यालयात जागतिक जल दिन साजरा
नवनीती न्यूज
गडचिरोली, दि. 22 : जलसंवर्धन करणे मानवी अस्तित्वासाठी आवश्यक बाब ठरली आहे. नागपूरची नाग नदी ज्याप्रमाणे दूषित होऊन गटरलाईन झाली, तशी स्थिती नैसर्गिक वनसंपदेने नटलेल्या गडचिरोली जिल्ह्यात येऊ नये, यासाठी कृतिमय प्रयत्न अपेक्षित आहे, असे प्रतिपादन प्राचार्य योगेश पाटील यांनी केले.
आयक्यूसी व भूगोल विभागाद्वारा गुरुवारी (दि. 22) जागतिक जल दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते अध्यक्षस्थनावरुन बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. नंदाजी सातपुते, डॉ. प्रमोद बोधाने, डॉ. प्रज्ञा त्रिपाठी, डॉ. पूनम मेश्राम मंचावर उपस्थित होते.
गेल्या दहा वर्षांत जागतिक पातळीवर वार्षिक पर्जन्य पडण्याचे प्रमाण 990 मिमी. तर बाष्पिभवन होण्याचा दर 736 मिमी. आहे. 254 मिमी. पावसाचे पाणी मानवाच्या गरजा भावगविण्यासाठी सक्षम होते. परंतू वाढत्या तापमानामुळे केवळ 150 मिमी. पाणी शिल्लक राहील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. करिता तापमान वाढ थांबविण्यासाठी वृक्षाचे प्रमाण वाढविणे काळाची गरज असल्याचे पाटील म्हणाले. याप्रसंगी डॉ. बोधाने यांनी साऊथ आफ्रिका येथील शहर जोहानसबर्ग जगातील पहिले पाणी नसलेले शहर म्हणून घोषित झालेले असल्याचे सांगितले. भारताचे तसे होऊ नये करिता त्यांनी उपाययोजना सुचविल्या. डॉ. सातपुते यांनी विद्यार्थिनींनी ग्रीन क्लब स्थापन करुन कृती आराखडा तयार करावा, असे मार्गदर्शन केले. डॉ. त्रिपाठी यांनी बंगळूर शहराची पाणीविना झालेली भयावय स्थिती स्पष्ट केली. संचालन प्रा. कीर्ती पुल्लकवार यांनी केले. आभार प्रा. दर्शना खेवले यांनी मानले. याप्रसंगी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थिनी बहूसंख्येने उपस्थित होते.



